breaking-newsराष्ट्रिय

नवी मुंबईच्या न्हावाशेवा बंदरात; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली अफगाणिस्तानातून आले 1,000 कोटींचे हेरॉईन

नवी मुंबई – नवी मुंबईच्या न्हावाशेवा बंदरात डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (DRI) आणि कस्टम विभागाने संयुक्तरित्या कारवाई करून आतापर्यंतच्या सर्वात मोठा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. न्हावाशेवा बंदरातील कंटेनरमधून या दोन्ही तपास यंत्रणांनी 1,000 कोटी रुपयांचे 191 हेरॉईन जप्त केले आहे.

मूळ इराणमधील तस्करांनी पाठविलेले हे हेरॉईन अफगाणिस्तानमधून भारतात आले होते. हे 191 किलो हेरॉईन प्लास्टिक पाईपमध्ये लपवून ठेवले होते. याप्रकरणी ड्रग्स इम्पोर्टचे कागदपत्र बनविणाऱ्या दोन कस्टम हाऊसच्या एजंटलादेखील अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय चार इतर इम्पोर्टर आणि फायनान्ससर्सना अटक करण्यात आली आहे.

सध्या इराण हा ‘हेजबोल्ला’ या दहशतवादी संघटनेचा बालेकिल्ला बनला आहे. बैरुतमध्ये याच अतिरेकी संघटनेने ‘अमोनियम नायट्रेट’ स्फोटकांचा साठा साठविल्याचा आरोप आहे. त्याचाच स्फोट होऊन बैरुत शहर गेल्याच आठवड्यात बेचिराख झाले आहे. दहशतवादी कारवायांसाठी पैसा उभा करण्यासाठी अंमली पदार्थांची तस्करीसुद्धा ही दहशतवादी संघटना करीत असते. सध्या अफगाणिस्तानातील तालिबानी दहशतवादी आणि अफगान सरकार यांच्यात करार झाला असून सर्व दहशतवादी तुरुंगाबाहेर आले आहेत. त्यांचाच वापर करून हे हेरॉईन इराणमधून अफगाणिस्थानमार्गे पाठविण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. न्हावाशेवा बंदरातील संशयित कंटेनर काल सीमा शुल्क विभागाने आणि महसूल गुप्त यंत्रणेने शोधून काढला. आयुर्वेदिक ‘मुलेठी’च्या नावाखाली कंटेनरमधून हेरॉईन आणण्यात आले होते. मुलेठीला भारतात मोठी मागणी आहे.

नेरूळच्या एम. बी. शिपिंग आणि लॉजिस्टिक सोलुशनचे कस्टम हाऊस एजंट मीनानाथ बोडके आणि मुंबईचे कोंडीभाऊ पांडुरंग गुंजाळ यांना आज न्यायालयात सादर करण्यात आले होते. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. यामागे फार मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे. त्याआधी अमृतसरमध्ये जानेवारी महिन्यात पंजाब पोलिसांच्या एसटीएफने कारवाई करून 194 किलो हेरॉईन पकडले होते. आरोपी मीनानाथ बोडके यांनी सांगितले आहे की, मोहम्मद नुमान नावाच्या माणसाने दिल्लीच्या सर्विम एक्सपोर्टचे इम्पोर्टर सुरेश भाटिया यांच्यासोबत भेट घडवून आणली होती. विशेष म्हणजे सुरेश भाटिया हा यापूर्वीही ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेला आहे. आता सर्वच गुप्तहेर यंत्रणा या प्रकरणी कसून तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button