breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

नवी मुंबईकरांसाठी खुशखबर, सिडकोच्या उर्वरित घरांच्या लॉटरीचा शुभारंभ

नवी मुंबई | नवी मुंबईमध्ये आपल्या हक्काचे घेण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. सिडकोने नुकतंच नवीन गृहनिर्माण योजनांबरोबरच आपल्या पूर्वीच्या गृहनिर्माण योजनांमधील उर्वरित घरे उपलब्ध करुन दिली आहे. सिडकोच्या वास्तुविहार सेलिब्रेशन आणि उन्नती गृहनिर्माण योजनेतील उर्वरित 76 घरांच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ काढले आहेत. त्यामुळे हक्काचे घर घेणाऱ्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

गृहनिर्माण योजनांपैकी वास्तुविहार सेलिब्रेशन गृहनिर्माण योजनेतील उर्वरित 45 तर उन्नती गृहनिर्माण योजनेतील उर्वरित 31 अशी एकूण 76 घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. वास्तुविहार सेलिब्रेशन योजनेतील घरे ही 1 आरके, 1 बीएचके आणि 2 बीएचके आहेत. तर उन्नती गृहनिर्माण योजनेतील घरे ही 1 आरके आणि 1 बीएचके प्रकारातील आहेत. या गृहनिर्माण योजनेशी संबंधित विविध प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहेत. यासाठी सिडकोतर्फे https://lottery.cidcoindia.com ही वेबसाइट दिली आहे. योजनेचे वेळापत्रक, अर्ज नोंदणी प्रक्रिया, सदनिकांचा तपशील, अनामत रक्कम, सदनिकेची अंदाजे किंमत इ. सर्व माहिती या वेबसाइटवर देण्यात आलेल्या योजना पुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे. यामुळे अर्जदारांनी अर्ज भरण्यापूर्वी योजना पुस्तिकेचे काळजीपूर्वक वाचन करावे. या योजना पुस्तिकेचे शुल्कही ऑनलाइन भरावे लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button