breaking-newsराष्ट्रिय

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भावावर गुन्हा दाखल

मुज्जफरनगर – बॉलिवुडचा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ अयाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह छायाचित्र टाकल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल हिंदु युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली होती.

अयाजुद्दीन याने टाकलेल्या छायाचित्रामुळे हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत अशी तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. या प्रकरणी बुधन गावात हिंदु युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या विरोधात निदर्शनेही केली. त्याला त्वरीत अटक करण्यात यावी अशी मागणी या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. अयाजुद्दीन याने जाणिवपुर्वक हा खोडसाळपणा केला आहे असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button