breaking-newsआंतरराष्टीय

नववधूची हत्या करणाऱ्या तिघांना अटक

लखनऊ : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये नववधूची हायवेवर हत्या केल्याप्रकरणी तिघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नवदाम्पत्य आणि वऱ्हाडींची लूटमार करताना नववधूने आरडाओरडा केल्यामुळे तिच्यावर गोळीबार केला, अशी कबुली आरोपींनी दिली आहे. या घटनेत 18 वर्षीय मेहवीश परवीनला प्राण गमवावे लागले.

नवदाम्पत्य जात असलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीचा चौघा लुटारुंनी आपल्या स्विफ्ट डिझायर गाडीतून पाठलाग सुरु केला. दौराला भागात पोहचल्यावर त्यांनी वऱ्हाडींच्या गाडीला ओव्हरटेक केलं आणि लूटमार सुरु केली. याचवेळी मेहवीशने आरडाओरड केली, त्यामुळे एका आरोपीने तिच्यावर गोळी झाडली. गोळीबारात मेहवीशचा मृत्यू झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button