breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवनिर्वाचित आमदार डॉ. विनय कोरे यांनी भाजपाला पाठींबा

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून सत्ता कोण स्थापन करणार याबाबत सगळ्यांचे लक्ष लागून आहे. शिवसेना आणि भाजपा दोन्ही पक्षांकडून अपक्षांना आपल्याकडे खेचण्यामध्ये चढाओढ सुरू आहे. अशातच एकेकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये राहिलेले व मंत्रिपद भूषवलेले जनसुराज्य शक्ती’चे नेते आणि शाहूवाडी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. विनय कोरे यांनी भाजपाला पाठींबा दिला आहे.

विनय कोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि भाजपा सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र भाजपाने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली. शिवसेनेच्या सत्यजीत पाटील यांचा पराभव करुन विनय कोरे विजयी झालेत. विनय कोरेंच्या पाठिंब्यामुळे भाजपाची ताकद अजून वाढली असून आतापर्यंत एकूण 9 अपक्षांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे त्यांचं संख्याबळ 105 वरुन 114 जागांवर पोहोचलं आहे.

भाजपा महाराष्ट्र✔@BJP4Maharashtra

‘जनसुराज्य शक्ती‘चे नेते आणि शाहूवाडी येथून निर्वाचित आमदार डॉ. विनयकुमार कोरे यांनी आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि भाजपा सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला.

View image on Twitter
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button