breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

नर्स डे निमित्त पंतप्रधान मोदी म्हणाले- आम्ही नर्सचे आभारी…

नवी दिल्ली | देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 71 हजार 360 झाली आहे. आज सकाळपासून 541 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यामध्ये एकट्या दिल्लीत 406 नवीन रुग्ण आढळले. याव्यतिरिक्त राजस्थानात 47, कर्नाटकात 42, आंध्रप्रदेशात 33, ओडिशामध्ये 23, बिहारमध्ये 12, चंदीगडमध्ये 6 आणि बिहारमध्ये 2 रुग्ण सापडले. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 70 हजार 756 कोरोनाग्रस्त आहेत. 46 हजार 8 जणांवर उपचार सुरु असून 22 हजार 454 रुग्ण बरे झाले आहेत. तर 2293 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिचारिका दिवसानिमित्त ट्विट करत या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. मोदींनी लिहिले की, आंतरराष्ट्रीय नर्स डे त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करण्याचा विशेष दिवस आहे. ते आपला ग्रह वाचवण्यासाठी चोवीस तास काम करतात. यावेळी ते कोविड-19 ला हरवण्यासाठी कठीण परिश्रम घेत आहेत. आम्ही नर्स आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभारी आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ते लॉकडाऊन वाढविण्यावर किंवा सवलती देण्यावर बोलू शकतात. सोमवारी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांसमवेत या विषयावर चर्चा केली. लॉकडाऊन संदर्भात हे त्यांचे पाचवे संबोधन असेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button