breaking-newsराष्ट्रिय

‘नरेंद्र मोदी फक्त आमचे नाही तर अख्ख्या देशाचे डॅडी’

पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे डॅडी आहेत असं अण्णाद्रमुक पक्षाचे नेते आणि मंत्री केटी राजेंद्र बालाजी यांनी म्हटलं आहे. पक्षाची बैठक पार पडल्यानंतर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. पत्रकारांनी त्यांना जयललिता यांनी राष्ट्रीय पक्षांशी आघाडी करण्याचं टाळलेलं असताना अण्णाद्रमुकने लोकसभेसाठी भाजपशी कशी काय आघाडी केली? असा प्रश्न केला. यावर बोलता त्यांनी नरेंद्र मोदी आमचे डॅडी असल्याचं म्हटलं.

‘अम्माचं (जयललिता) निधन झाल्यापासून मोदीच आहेत ज्यांनी डॅडींप्रमाणे पक्षाचं मार्गदर्शन केलं’, असं बालाजी यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘हो नक्कीच…मोदी आमचे डॅडी आहेत. जेव्हापासून आम्ही आमच्या अम्माला गमावलं तेव्हापासून पंतप्रधान मोदींनी डॅडींप्रमाणे आम्हाला पाठिंबा दिला आणि मार्गदर्शन केलं’.

‘मोदी फक्त अण्णाद्रमुकचे डॅडी नाहीत तर देशाचेही डॅडी आहेत. यामुळेच अण्णाद्रमुकने भाजपाशी आघाडी केली आहे’, असं बालाजी यांनी सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे, 2014 लोकसभा निवडणुकीत जयललिता यांनी ‘तामिळनाडूची लेडी किंवा गुजरातचे मोदी’ अशी घोषणा दिली होती. नरेंद्र मोदींना टोला लगावला असल्याने ही घोषणा बरीच प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचं उमेदवार घोषित करण्यात आलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button