breaking-newsताज्या घडामोडीपुणे

नयना पुजारी सामूहिक बलात्कार प्रकरणी तिघे दोषी ; उद्या सुनावणार शिक्षा

पुणे: संगणक अभियंता नयना अभिजित पुजारी बलात्कार आणि खून प्रकरणी तीन आरोपींवर अपहरण,बलात्कार,हत्या हे गुन्हे सिद्ध झाले आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर न्यालयाने आज (सोमवारी) तीघांना दोषी ठरवले आहे. या आरोपींना उद्या (दि.9) सकाळी आकरा वाजता न्यायालय शिक्षा सुनावणार आहे.
खराडी येथील सिनेक्रोन आयटी कंपनी मध्ये काम करणारी नयना पुजारी (वय 26) कामावरून सुटल्यावर तिचा कॅबचालक योगेश राऊत याने तिचे अपहरण करून 3 मित्रांच्या सहाय्याने तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिचा ओढणीने गळा दाबून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह खेड येथील जंगलामध्ये फेकून देण्यात आला होता. ही घटना ऑगस्ट 2009 मध्ये घडली होती.
या प्रकरणी विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी आज  आरोपी योगेश अशोक राऊत , महेश बाळासाहेब ठाकूर , विश्वास हिंदुराव कदम यांना दोषी ठरविले आहे. या प्रकरणात आरोपींचा साथीदार राजेश पांडुरंग चौधरी माफीचा साक्षीदार बनला आहे. या प्रकरणी आरोपींना उद्या साकाळी आकरा वाजता शिक्षा सुनावली जाणार आहे.

 नयना पुजारीचे पती अभिजीत पुजारी म्हणाले, खूनाच्या आरोपींना ज्या प्रकारे फाशीची शिक्षा दिली जाते. त्या प्रमाणे बलात्कार करणा-या आरोपीला देखील फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अशा प्रकरणाची केस जलदगती न्यायलयात चालवली पाहिजे. हा निकाल देण्यास विलंब झाला असून या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
 नयना पुजारीची बहिण मनीषा गनबावणे म्हणाल्या, या प्रकरणी आता आरोपींना दोषी  ठरवण्यात आले आहे. अजून निकाल लागला नाही. या निकालास विलंब झाला आहे. दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याची अमलबजावणी लवकर झाली पाहिजे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button