breaking-newsपिंपरी / चिंचवड

नगराध्यक्ष चित्रा जगनाडे यांच्यावर अपात्रतेची, तर नऊ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस

तळेगाव दाभाडे| तळेगाव दाभाडे येथील स्टेशन विभागातील तळ्यातील गाळ-माती उत्खनन कामातील अनियमितता व गैरव्यवहार प्रकरणी प्राप्त झालेल्या चौकशी अहवालांच्या आधारे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्यावर अपात्रतेची तसेच नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी वैभव आवारे, लेखापाल ज्ञानेश्वर मोहिते यांच्यासह नऊ अधिकारी व कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करणारा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. 

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील तळ्यातील माती व मुरुम यांची अनाधिकृतरित्या उत्खनन केल्याप्रकरणी तळेगाव नगरपरिषदेला 79 कोटी 64 लाख 94 हजार 600 रुपये दंड भरण्याचे आदेश मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांनी दिले आहेत. या तलावातून साधारण 2 लाख 376 ब्रास इतकी मुरुम व माती अनाधिकृतपणे काढली आहे. त्यासाठी  उत्खननासाठी प्रती ब्रास 400 रुपये प्रमाणे दंड ठोठावला आहे. यानुसार रॉयल्टीच्या पाचपट म्हणजे 79 कोटी 64 लाख 94 हजार 600 रुपये दंड भरण्याचे आदेश नगरपरिषदेस देण्यात आले आहेत.

या पाठोपाठ जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी दोषारोप निश्चित करून नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई करण्याची तसेच तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह दोषी असलेले नऊ अधिकारी व कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठविण्याची शिफारस केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

डिझेल पुरविणे, श्रद्धा इन्फ्रावन या ठेकेदाराकडून काम करवून घेणे तसेच गाळ काढणे, खोदाई, गाळ वाहतूक व गाळ पसरविणे या कामांमध्ये अनियमितता तसेच गैरव्यवहार झाल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.

निवडणुका जवळ आल्याने विरोधकांचा राजकीय स्टंट – चित्रा जगनाडे

तळेगाव दाभाडेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी यासंदर्भातील सर्व आरोप फेटाळून लावले. या प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही. सर्व नियमांचे पालन करून आणि नगर परिषद सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊनच ठराव झाले आहेत. ठरावांची अंमलबजावणी करण्याचे काम प्रशासनाचे आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींना दोषी धरता येणार नाही. माझ्यावर आरोप करणे अथवा माझ्या राजीनाम्याची मागणी करणे, हे विरोधकांचे कामच आहे. निवडणुका जवळ आल्याने विरोधकांकडून हा राजकीय स्टंट करण्यात येत आहे, असा प्रत्यारोप जगनाडे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button