breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नगरसेवक विलास मडिगेरी बनले स्थायीचे एक दिवसाचे सभापती

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – कौटुंबिक कारणांमुळे स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांना स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित राहणे शक्य न झाल्याने आजच्या बैठकीत सभापतीचे कामकाज पाहण्याची संधी भाजपचे नगरसेवक विलास मडिगेरी यांना लाभली. एक दिवसात त्यांनी 93 कोटींच्या विकास कामांना मंजुरी देण्याची मजल मारली. अभ्यासू वृत्ती आणि विषयांच्या खोलात जाण्याची त्यांची जिज्ञासा औटघटकेचे सभापती होऊन काम करण्यासाठी उपयोगात आल्याचे त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर महत्वाच्या पदांवर केवळ भाजपच्या जुन्या व निष्ठावंत पदाधिका-यांना संधी मिळणार होती. मात्र, जुन्या पदाधिका-यांऐवजी नवीन नगरसेवकांना महत्वाच्या पदांवर काम करण्याची संधी देण्यात आली. पहिल्या वर्षात स्थायी समिती सभापती होण्याचा बहुमान नगरसेविका सीमा सावळे यांना मिळाला. त्यानंतर दुस-या वर्षात ही संधी ममता गायकवाड यांना देण्यात आली. त्यांच्यासोबत सदस्य म्हणून काम करणारे विलास मडिगेरी यांची विषयांची हातोटी आणि जिज्ञासू वृत्ती यामुळे त्यांनी प्रशासनावर अल्पावधीतच पकड निर्माण केली. सभापती गायकवाड यांना देखील स्थायीच्या कामकाजात त्यांची मोलाची मदत होत असते.

आज मंगळवारी (दि. 4) झालेल्या स्थायीच्या सभेला कौटुंबिक कारणांमुळे सभापती ममता गायकवाड उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे कामकाज पाहण्याची संधी मडिगेरी यांना मिळाली. प्रशासनावरील त्यांची पकड मजबूत असल्यामुळे त्यांना आज सभा हाताळताना कोणत्याही प्रकारची अडचण आली नसल्याचे त्यांनी सांगितले. अत्यंत खेळी-मेळीच्या वातावरणात सभेचे कामकाज त्यांनी पार पाडले. एकूण 93 कोटींच्या विकास कामांना त्यांनी मंजुरी दिली. औटघटकेचे का होईना सभापतीपद मिळाल्याने मडिगेरी यांच्या चेह-यावर आनंद दिसून येत होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button