breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

नगरसेवक दत्ताकाका साने विरोधी पक्षनेते; तर शहराध्यक्षपद मिळणार चिंचवडला?

– संजोग वाघेरे यांना ‘मावळ’ उमेदवारी ‘फायनल’

– पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीतील हालचालींना वेग

पिंपरी- राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांची निवड झाल्यानंतर आता पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीत खांदेपालट करण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना मावळ लोकसभा निवडणुकीत उमेदवारी ‘फायनल’ झाली असून, शहराध्यक्षपद चिंचवड विधानसभा मतदार संघाकडे आणि विरोधी पक्षनेते पद भोसरी विधानसभा मतदार संघात देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

दरम्यान, माजी महापौर योगेश बहल यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ पूर्ण केला असून, नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नगरसेवक दत्ताकाका साने आणि विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वास्तविक, नाना काटे यांनी राष्ट्रवादीचे ‘कारभारी’ अजित पवार यांच्याकडे जबरदस्त ‘फिल्डिंग’ लावली आहे. पण, चिंचवड विधानसभेसाठी नाना काटे यांना उमेदवारी निश्चित झाल्यास विरोधी पक्ष नेतेपदी त्यांना अपेक्षीत वेळ देता येणार नाही. त्यामुळे विधानसभेची तयारी करण्यासाठी नाना काटे यांना पुरेसा वेळ मिळावा, असा सूर पक्षश्रेष्ठींनी धरला आहे.

दुसरीकडे, नगरसेवक दत्ताकाका साने यांनी विरोधी पक्षनेतेपदी संधी मिळावी, अशी गळ अजित पवार यांना घातली आहे. पण, भोसरी विधानसभा निवडणुकीत पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा ‘प्रामाणिक’पणे प्रचार करणार असाल तरच विरोधी पक्षनेतेपदी संधी देवू, असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले आहे. त्याला नगरसेवक साने यांनी होकार दिला असून, विधानसभेत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणून आणणार, असे आश्वासन साने यांनी अजित पवार यांना दिले आहे. त्यामुळे नगसेवक साने यांना विरोधी पक्षनेते पद देण्याचे जवळपास निश्चित झाले असून, केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे, अशी माहिती राष्ट्रवादीतील विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडून अजित गव्‍हाणे, जावेद शेख, वैशाली घोडेकर, राजू मिसाळ यांचीही नावे विरोधी पक्षनेते पदासाठी चर्चेत आहेत.

———

शहराध्यक्षपदी हवाय ‘नवा चेहरा’
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात त्याच-त्या चेह-यांमुळे राष्ट्रवादीबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये कुतूहल राहिलेले नाही. विशेष म्हणजे, वरिष्ठ नेत्यांचे भाजपमधील वरिष्ठ नेत्यांसोबत ‘सलोखा’ आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपविरोधात रान पेटवण्यास ज्येष्ठ नेते कच खाताना दिसतात. पण, नवोदित कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी देवून राष्ट्रवादीची भूमिका तळागाळात पोहचण्याची गरज आहे. त्यामुळे पुण्यात झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी नवोदित कार्यकर्त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याची भूमिका मांडली होती. परिणामी, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांनी आता बाह्या सरसावल्या आहेत. त्यामध्ये नगसेवक अजित गव्‍हाणे, माजी स्थायी समिती सभापती प्रशांत शितोळे, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, युवा नेते संदीप पवार यांची नावे चर्चेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button