breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नंदूरबारमध्ये भूकंपाचे धक्के, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात भूकंपाचे केंद्र
नंदुरबार – नंदूरबारमधील शहादा तालुक्यात आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. आजूबाजूच्या अनेक गावात भूकंपाचे धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल एवढी आहे.
शहादा तालुक्यातील सावळदा भूकंप मापन केंद्रावर या भूकंपाची नोंद झाली आहे. महारष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात भूकंपाचे केंद्र असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.