breaking-newsक्रिडा

धोनी- झिवाचा ‘हा’ व्हिडिओ होतोय व्हायरल

पुणे : ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनीच्या कुटुंबवत्सलतेची साक्ष देणारा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धोनी हा त्याची मुलगी झिवासोबत खेळत असल्याचा हा व्हिडिओ आहे. बापलेकीच्या खेळाचा हा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्जने ट्विट केला आहे. तो लाखो युजर्सनी शेअर केला आहे.

या व्हिडिओत झिवा धोनीच्या टोपीशी खेळते आहे. आधी ती धोनीच्या डोक्यावरच्या टोपीला हात लावायचा प्रयत्न करते, पण धोनी तिला चकवा देतो. पण ती हट्ट सोडत नाही. ती पुन्हा टोपीला हात लावायचा प्रयत्न करते. यावेळी मात्र धोनी झिवाला टोपीशी खेळू देतो. थोडावेळ टोपीशी खेळल्यावर झिवा ती टोपी अलगदपणे आपल्या वडिलांच्या डोक्यावर ठेवते आणि आनंदित होऊन मैदानावर उड्या मारायला लागते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button