breaking-newsक्रिडा

धोनीला वगळण्यात माझा हात नाही – विराट

माजी कर्णधार एम.एस. धोनीला टी-२० मालिकेतून वगळण्यात माझा हात नव्हता आणि त्याला वगळल्याबाबात मला माहितीही नव्हती हा सर्वस्वी निर्णय निवड समितीचा होता असा खुलासा भारताचा कर्णधार विराट कोहलीने केला आहे. वेस्ट इंडिजबरोबरच्या मालिका विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता. धोनीला वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरोधातील टी-२० मालिकेतून वगळल्यानंतर क्रीडा विश्वामध्ये आश्चर्य व्यक्त केले गेले होते. धोनीच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत विराट कोहलीवर सडकून टीका केली होती.

एका पत्रकाराने धोनीला टी-२०मधून वगळण्याबातचा प्रश्न विचारला. त्यावर विराट कोहलीने कटाकक्षाने उत्तर दिले. तो म्हणाला, ‘जर मी चुकीचा नसेल तर, धोनीला टी-२० मध्ये वगळण्यात का आले याबाबत निवड समितीने आधीच सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा त्याबाबत मी काय बोलणार. निवड समितीने नेमकं काय घडले याबाबतचा खुलासा आधीच केला आहे.’

‘परिस्थिती न समजून घेता लोक काहीही बोलत राहतात, आणि त्यांना मी थांबवू शकत नाही. भारतीय संघाचा धोनी अविभाज्य घटक आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पंत निर्भिडपणे खेळतो. त्याला टी-२० सारख्या प्रकारामध्ये अधिकाधिक संधी मिळावी असे धोनीला वाटतेय, असे विराट कोहली म्हणाला.’ ‘धोनीचा नेहमी युवा खेळाडूंना संधी देण्याचा आणि मदत करण्याचा प्रयत्न असतो. याशिवाय आणखी काही नाही, असेही विराट कोहली म्हणाला.’

वेस्ट इंडिजबरोबरच्या पाच एकदिवसीय सामन्याची मालिकेत भारताने ३-१ ने विजय मिळवला आहे. या मालिकेत विराट कोहलीला मालिकाविराचा पुरस्कार दिला आहे. भारताचा हा वेस्ट इंडिजविरोधातील आठवा तर भारताताली सलग सहावा मालिकाविजय होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button