breaking-newsपिंपरी / चिंचवड

धनगर समाजाचे एसटी आरक्षण त्वरीत जाहीर करा, धनगर समाजाची मागणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

धनगड की धनगर यातील तिढा बाजुला सारून धनगर समाजासाठी एसटी आरक्षण लागू करावे, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात दुर्गे यांनी मुख्यमंत्र्यांना देण्यात येणारे निवेदन पिंपरी-चिंचवडचे नायब तहसिलदार चोबे यांच्याकडे दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धनगर समाजाच्या ST आरक्षणाचा निर्णय जाहीर कारवा. धनगड की धनगर हा खेळ थांबवुन आम्हाला आमचे आरक्षण त्वरित मिळवून द्यावे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर निवेदन देताना सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करण्यात आले. यावेळी धनगर समाजाचे प्रमुख कार्यकर्ते राजू दुर्गे, विणा सोनवलकर, सोना गडदे, नंदा करे, शरद कर्णवार, रणजित हापटे, साहिल धिवार, निखिल पडळकर आदी सर्वजण उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button