breaking-newsTOP NewsUncategorizedमुंबईराष्ट्रिय

धक्कादायक! भीक मागणारा निघाला IIT पासआऊट; समोर आले वास्तव

होय, मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एक ९० वर्षी वृद्धाच्याबाबतीत ही माहिती समोर आली आहे. त्यांचे नाव सुरेंद्र वशिष्ठ आहे आणि त्यांचे वय जवळपास ९० वर्ष आहे. गल्लीगल्लीमध्ये भीक मागून रस्त्याकडेला राहत होते. त्यांची स्थिती खूपच खराब होती. जेव्हा चौकशी केली तेव्हा ते आयआयटी कानपूर पासआऊट असल्याचे समजताच सर्वांना धक्काच बसला.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आयआयटी पासआऊट सुरेंद्र यांना एका संघटनेने मदत केली. आश्रम स्वर्ण सदनसोबत असलेल्या विकास गोस्वामी यांनी सांगितले की, आम्ही सुरेंद्र यांना बस स्टँडजवळ खूप वाईट परिस्थितीत पाहिले. त्यांच्यासोबत जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी इंग्रजीत बोलण्यास सुरुवात केली. त्यांना आम्ही समजावून आश्रमात घेऊन आलो. त्यांच्या घरच्यांशीही बोलायचा आम्ही प्रयत्न केला.

सुरेंद्र यांनी आश्रमातील लोकांना सांगितले की,1969 मध्ये त्यांनी कानपूरमध्ये मॅकेनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास केला होता. 1972 मध्ये त्यांनी एलएलएम केले होते. त्यांचे वडील जेसी मिलमध्ये सप्लायर होते. ही कंपनी नंतर बंद पडली. 

अवश्य वाचाः ब्रिटनमध्ये ९० वर्षीय आजींना कोरोना लसीचा पहिला डोस

योगायोग; मदतीसाठी धावला अधिकारी अन् समोर आली धक्कादायक माहिती

योगायोग म्हणजे गेल्याच महिन्यात ग्वाल्हेरमध्ये अशीच एक घटना घडली होती. रस्त्याच्या कडेला पोलिसांना एक भिकारी थंडीत कुडकुडत दिसला. त्या व्यक्तीला पोलिसांनी मदतीचा हात दिला. मात्र व्यक्तीची अधिक चौकशी केली असता पोलिसांना मोठा धक्काच बसला.

मिळालेल्या माहितीनुसार,ग्वाल्हेरमधील पोट निवडणुकीच्या मतमोजणी नंतर दोन पोलीस अधिकारी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर परतत होते. त्याचवेळ त्यांना रस्त्याच्या कडेला थंडीने कुडकुडत असलेला एक भिकारी दिसला.

अवश्य वाचाः शेतकरी आंदोलनाला ‘पाकिस्तान’ कडून रसद; भाजपच्या ‘या’ नेत्यांचे वादग्रस्त विधान

पोलिसांनी गाडी थांबवून त्या व्यक्तीला मदत केली. भिकाऱ्याची अवस्था पाहून त्यांना तो मनोरुग्ण असल्याचं समजलं. यापूर्वी या माणसाला कुठेतरी पाहिल्यासारखंही पोलिसांना सतत वाटत होतं. चौकशी केल्यावर त्यांना मोठा धक्काच बसला. कारण हा भिकारी त्यांच्याच बॅचचा पोलीस ऑफिसर असल्याचे समजले. ही व्यक्ती मनीष मिश्रा होती.

1999 सालच्या बॅचचे ते पोलीस अधिकारी होते आणि त्या वेळी अचूक नेम साधणारा निशाणेबाज म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी मध्य प्रदेशात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी म्हणून काम केलं. पण 2005 च्या सुमारास त्यांना मानसिक त्रास सुरू झाला. आश्रम स्वर्ण सदन संघटनेने मनीष मिश्रा यांनाही मदत केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button