breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

धक्कादायक! भांडूपमध्ये घरातील शौचालयात आढळला सात फुटी अजगर

मुंबईत घराच्या शौचालयात साप, अजगर येतात असे कोणी तुम्हाला सांगितले तर तुम्ही सांगणाऱ्याला वेडयात काढाल. पण भांडूपमध्ये वास्तवात अशी घटना घडली आहे. भांडूपमध्ये महापालिका वसाहतीत राहणारे विनय ढोबळे यांच्या शौचालयात चक्क सात फुटी अजगर आढळला. या प्रकारामुळे ढोबळे कुटुंबिय हादरुन गेले आहेत.

शौचालयात भलामोठा अजगर पाहून ढोबळे यांच्या पत्नीला तर चक्कर आली. मध्यरात्रीच्या सुमारास विनय यांनी शौचालयाचा दरवाजा उघडला तेव्हा कमोडमध्ये अजगर पाहून त्यांचे धाबे दणाणले. त्यांनी लगेच दरवाजा बंद करुन बाहेरुन कडी लावली. महापालिका वसाहतीत तळ मजल्यावर राहणाऱ्या विनय ढोबळे यांनी लगेच पत्नी आणि मुलांना घेऊन घराबाहेर पडले व शेजाऱ्यांना जागे करुन त्यांना या प्रकाराची माहिती दिली.

सुदैवाने त्यावेळी ढोबळे यांचा शेजारी अक्षय पाटकरकडे सर्पांची सुटका करणाऱ्या एका संस्थेचा फोन नंबर होता. रात्री दोनच्या सुमारास विनय ढोबळे यांच्या घराच्या कमोडमधून सर्पमित्रांनी या अजगराची सुटका केली. विनय ढोबळे ज्या ठिकाणी राहतात तो भाग संजय गांधी नॅशनल पार्कजवळ आहे. ढोबळे यांच्या घरापासून काही अंतरावर काही तासांनी आणखी एक अजगर सापडला.

हा अजगर नागरी वस्तीपर्यंत कसा पोहोचला हे सांगता येणे कठीण आहे. पण भक्ष्याच्या शोधात जलवाहिनीमधून हा अजगर घराच्या शौचालयापर्यंत आला असावा असा अंदाज सर्पमित्राने व्यक्त केला. महापालिकेत काम करणारे विनय यांना दोन मुले असून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला या प्रकाराने धक्का बसला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button