breaking-newsआंतरराष्टीय

धक्कादायक! प्रयोगशाळेतूनच ‘करोना’चा प्रसार

  • चिनी वैज्ञानिकांच्या शोधनिबंधात धक्कादायक दावा

करोना विषाणूचा प्रसार वुहान येथील प्राण्यांच्या बाजारपेठेतून नव्हे तर तेथून जवळच असलेल्या एका प्रयोगशाळेतून झाल्याचे चिनी वैज्ञानिकांनी म्हटले आहे. चीनमध्ये बरीच माहिती हळूहळू बाहेर येत असून वुई चॅटमधून ही धक्कादायक बाब सामोरी आली आहे.चीनच्या विज्ञान अकादमीने हा दावा फेटाळला आहे. जीवशास्त्रज्ञ बोटाओ झियाओ व ली झियाओ यांनी ‘दी पॉसिबल ओरिजिन्स ऑफ २०१९ एनसीओव्ही करोना व्हायरस’ हा शोधनिबंध सादर केला आहे.

वुहानमध्ये सागरी अन्नाची बाजारपेठ असली तरी तेथून जवळच दोन प्रयोगशाळा आहेत. त्या प्रयोगशाळांचा इतिहास तपासला असता तेथूनच विषाणू पसरल्याचे सूचित होते असे शोधनिबंधात म्हटले आहे. हा विषाणू वटवाघळातून माणसात आला, पण तो वुहान येथील सागरी अन्न बाजारपेठेतील वटवाघळातून पसरला असे चिनी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बाजारपेठेत वटवाघळे नव्हती, असे शोधनिबंधात म्हटले आहे. या प्रयोगशाळेत वटवाघळांना होणाऱ्या रोगांवर प्रयोग सुरू होते व त्यातून हा विषाणू पसरला आहे, कारण जो पहिला रुग्ण आहे तो कधीच वुहानच्या प्राणी बाजारपेठेत गेलेला नव्हता मग त्याच्यात विषाणू कुठून आला हा प्रश्न अनुत्तरित होता. एका आजारी वटवाघळाने संशोधकांवर हल्ला केला, त्यात एका महिलेचाही समावेश होता. या वटवाघळाचे रक्त, लघवी त्यांच्या अंगावर पडले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button