breaking-newsपुणेमहाराष्ट्र

धक्कादायक: पुण्याच्या इंजिनीअर मुलीला अडीच महिने घरात कोंडून बलात्कार, केलं व्हिडीओ शुटिंग

पुण्यातील २७ वर्षीय इंजिनीअर तरुणीला अडीच महिने घरात कोंडून बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी अंधेरीचा रहिवाशी असून लग्नास नकार दिल्याने त्याने तरुणीला आपल्या घरात कोंडून ठेवलं होतं. तरुणीवर शारिरीक अत्याचार करताना आरोपी तरुणाने सर्व सीमा ओलांडल्या होत्या. अखेर अडीच महिन्यांनी आरोपीच्या तावडीतून पळ काढण्यात तरुणीला यश मिळालं. तेथून पळ काढताच तरुणीने पुण्यातील आपल्या बहिणीचं घर गाठलं आणि पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. यानतंर पोलिसांनी कारवाई करत आरोपी सय्यद आमीर हुसेन याला त्याच्या अंधेरीमधील घरातून अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. पीडित तरुणी आरोपीच्या घरी गेली असता तिला गोड पदार्थातून गुंगीचं औषध देण्यात आलं होतं. तरुणी एका वर्षांपूर्वी गोव्यातून पुण्याला शिफ्ट झाली होती. ‘जेव्हा तरुणी आरोपी हुसेनच्या घरी गेली तेव्हा तिला गोड पदार्थ खाण्यासाठी देण्यात आला. त्यामध्ये गुंगीचं औषध मिसळण्यात आलं होतं. तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. तरुणी शुद्धीत आल्यानंतर आरोपी हुसेनने तिला मोबाइलमध्ये बलात्कार करतानाचा शूट केलेला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल केलं. सुरुवातीला त्याने ३० जूनपर्यंत तरुणीला आपल्या घरात कोंडून ठेवलं. यादरम्यान तो सतत तरुणीवर बलात्कार करत होता. इतकंच नाही तर चामडी पट्ट्याने मारहाणही करत होता. त्याने तरुणीचं डेबिट कार्ड काढून घेत त्यातून ४० हजार रुपये काढून घेतले होते’, अशी माहिती ओशिवारा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या तक्रारीत ३० जूनला आरोपी हुसेनने आपल्या सोडून दिल्याचं सांगितलं आहे. ‘मात्र यादरम्यान तो सतत माझा पाठलाग करत होता. ३ जूनला त्याने फोन करुन घरी आली नाहीस तर तुझा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी दिली. ३ जुलैला त्याने मला पुन्हा त्याच्या घरी जाण्यास भाग पाडलं’, असं तरुणीने तक्रारीत सांगितलं आहे.

आरोपी तरुणाने तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र तरुणीने नकार दिला होता असं पोलिसांनी सांगितलं आहे. ‘तरुणीने सांगितल्यानुसार आरोपी तरुण तिला कपड्याच्या सहाय्याने बांधून लैंगिक अत्याचार करत होता. जर लग्न केलं नाही तर तुला देहविक्रीय करणाऱ्यांकडे विकू अशी धमकीही दिली होती’, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. आरोपी हुसेनने आपण याआधी अशाच प्रकारे दोन तरुणींना टार्गेट केलं होतं असं तरुणीला सांगितल्यांचं पोलिसांनी सांगितलं आहे.

२५ ऑगस्ट रोजी तरुणी आरोपी हुसेनच्या घरातून पळ काढण्यात यशस्वी झाली. पळ काढल्यानंतर तरुणीने पुण्यातील बहिणीचं घर गाठलं. नातेवाईकांनी तिला कोथरुड पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी १ सप्टेंबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. ‘प्रकरण ओशिवारा पोलिसांकडे सोपवण्यात आलं असून ते तपास करत आहेत’, अशी माहिती कोथरुड पोलीस ठाण्याचे निरीक्षक आप्पासाहेब शेवाळे यांनी दिली आहे.

आरोपी हुसेनला अंधेरी न्यायालयात हजर केलं असता त्याला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस तरुणीला देण्यात आलेलं गुंगीचं औषध तसंच व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आलेला मोबाइल मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button