breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

धक्कादायक! पाकिस्तानमध्ये भारतीय दुतावासातील दोन अधिकारीही बेपत्ता

इस्लामाबाद: पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील भारतीय दुतावासातील 2 भारतीय अधिकारी बेपत्ता झालेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील भारतीय दुतावासातील हे अधिकारी मागील दोन ते अडीच तासापासून बेपत्ता झालेले आहेत. त्यांचा शोध लावला जात आहे. यानंतर पाकिस्तान सरकारवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सीआयएसएफचे दोन ड्रायव्हर ड्यूटीवर बाहेर जात होते. मात्र, ते आपल्या ठिकाणावर पोहचण्याआधीच बेपत्ता झाले. त्यांच्या अपहरणाचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. यानंतर चालकांचा तपास सुरु आहे. भारतीय अधिकाऱ्यांच्या बेपत्ता झाल्याची माहिती पाकिस्तान सरकारला देखील देण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button