breaking-newsताज्या घडामोडी

धक्कादायक… गुन्हेगारांना उमेदवारी देण्यात भाजप आघाडीवर; कर्नाटक निवडणुकीतील स्थिती

बेंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजप, काँग्रेससह इतर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. इतकंच नाही तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले; तसेच भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. गुन्हेगारांना उमेदवारी देण्यात भाजप आघाडीवर आहे. त्यांच्या २२४ पैकी ८३ (३७ टक्के) उमेदवारांवर अनेक गुन्हे दाखल आहेत.
भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आहे. त्यांच्या २२० पैकी ५९ उमेदवारांवर गुन्हेगारी खटले दाखल आहेत. जेडीएसच्या १९९ पैकी ४१ उमेदवारांवरही गुन्हे दाखल आहेत. ‘एडीआर’ने रविवारी प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षण अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार २०१३मधील विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत २०१८ मध्ये गुन्हेगारी खटले दाखल असलेल्या उमेदवारांची संख्या ३३४ वरून ३९१ वर पोहोचली आहे.
उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे ‘एडीआर’नं हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात २५६०पैकी ३९१ उमेदवारांनी आपल्याविरोधात गुन्हेगारी खटले दाखल असल्याचे जाहीर केले आहे. भाजपच्या ५८ उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यात दोषी आढळल्यास कमीत-कमी पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते. तर काँग्रेसच्या ३२ आणि जेडीएसच्या २९ उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button