Uncategorized

धक्कादायक! केईएम रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळं भाजल्याने बाळाचा कापावा लागला हात

मुंबई | महाईन्यूज | केईएम रुग्णालयाच्या बालरोग विभागात गुरुवारी अचानक शॉर्टसर्किट झालं. या घटनेत हृदयावर उपचार घ्यायला आलेला अडीच महिन्यांचा चिमुरडा प्रिन्स गंभीररित्या जखमी झाला. चिमुकला प्रिन्स हा उत्तर प्रदेशमधून मुंबईत खास उपचारासाठी दाखल झाला होता. शॉर्टसर्किटच्या घटनेत प्रिन्सचा हात आणि कानाचा काही भाग भाजला त्यात प्रिन्सचा हात दंडातून कापावा लागला आहे.

प्रिन्सच्या आयुष्याची वाटचाल नुकतीच कुठे सुरु झालीये पण रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे आयुष्यभर त्याला हात नसलेलं आयुष्य जगावं लागणार आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गावर आता भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळच्या उत्तरप्रदेशच्या मऊ जिल्ह्यातील कबिराजपुरमध्ये राहणारे पन्नेलाल राजभर यांना अडीच महिन्यांपूर्वीच एक पुत्रप्राप्ती झाली. पण, प्रिन्सची तब्येत सतत खालावलेल्या अवस्थेत होती. त्यानंतर, कुटुंबियांना प्रिन्सच्या छातीत छिद्र असल्याचे कळलं. त्यामुळे, कुटुंबीय बाळाला घेऊन मुंबईत असणाऱ्या आपल्या भावोजींच्या घरी दाखल झाले. त्यानंतर, उपचारांसाठी ते पालिकेच्या केईएम रुग्णालयात गेले. डॉक्टरांनी तपासणी करत मंगळवारी बाळाला अॅडमिट करुन घेतलं. बुधवारी मध्यरात्री 2.50 वाजण्याच्या सुमारास बेडच्या बाजूला ऑक्सिजन आणि अन्य वायरमध्ये अचानक आग लागली. या आगीच्या घटनेमध्ये बाळाचा एक हात आणि एका बाजूचा चेहरा भाजला. त्यामुळेच प्रिन्सचा हात कापावा लागला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button