breaking-newsराष्ट्रिय

धक्कादायक ! आयसीयूमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात(आयसीयू) दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रुग्णालयातीलच पाच कर्मचाऱ्यांनी हा अतिशय घृणास्पद प्रकार केल्याचा आरोप आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशच्या बरेली येथील बदायूं रोड परिसरात असलेल्या एका खासगी रुग्णालयात ही घटना घडली आहे.

पोलीस अधीक्षक ए. सिंग यांनी सांगितल्यानुसार, पीडित मुलीला आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आल्यानंतर तिने आपल्यासोबत झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. साप चावल्यामुळे पीडित मुलीला रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं, त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यावर तिला जनरल वॉर्डमध्ये आणलं असता तिने अत्याचाराची कहाणी सांगितली. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला सोमवारी बदायूं रोडला असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बुधवारपर्यंत व्हेंटिलेटवर ठेवल्यानंतर तिची प्रकृती सुधारली होती. त्यानंतर तिला जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं. शुक्रवारपर्यंत तिच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क लावलेला होता. ‘या दरम्यान एक इंजेक्शन देण्यात आल्यानं माझी शुद्ध हरपत होती. यावेळी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली. दोन्ही हाथ आणि पायही बांधले. यानंतर पाच कर्मचाऱ्यांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केला. आपले वडील आल्यावर त्यांना घडलेली घटना सांगण्याचा प्रयत्न केला. पण तोंडावर मास्क असल्याने त्यांना ते कळलं नाही, असं पीडित मुलीने सांगितल्याची माहिती आहे. रुग्णालयातील एक कम्पाउंडर आणि चार सफाई करणाऱ्यांवर बलात्काराचा आरोप असल्याचं कळतंय. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार आहेत, पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button