breaking-newsताज्या घडामोडीपुणे

धक्कादायक…आमदार लांडगे गटाचा राष्ट्रवादीच्या मोरेश्वर भोंडवेंना पाठिंबा?

– महापौर काळजेसह नगरसेवक राहुल जाधव, शितल शिंदे यांचा राजीनामा

– राष्ट्रवादीचे मोरेश्वर भोंडवे अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात

– विकास शिंदे
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती निवडीमध्ये भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे गटाला ‘सपशेल’ डावलण्यात आले. त्यामुळे लांडगे समर्थक महापौर नितीन काळजे यांच्यासह ‘स्थायी’चे सदस्य राहुल जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या जुन्या गटातील तीव्र इच्छुक असलेल्या नगरसेवक शितल शिंदे यांनीही स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शहर भाजपमध्ये मोठी दुफळी निर्माण झाली आहे.

श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक चाव्या ममता गायकवाड यांच्या हाती असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपकडून त्यांचा अर्ज भरण्यात आला आहे. स्थायीत भाजपचे बहुमत असल्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. त्यांच्या नावावर सात मार्चला शिक्कामोर्तब होईल. पिंपरी-चिंचवड महापालिका तिजोरीच्या चाव्या आपल्या समर्थकाच्या हाती घेण्यासाठी भाजप नेत्यांच्या जोरदार हालचाली सुरु होत्या. त्यामुळे कोणत्या विधानसभा मतदारसंघाकडे स्थायीचे अध्यक्षपद जाणार याकडे राजकीय वर्तुळासह शहराचे लक्ष लागले होते. या सर्व हालचालींना आणि चर्चेला पूर्णविराम मिळाला. स्थायीचे अध्यक्षपद चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पारड्यात पडले आहे.

महापौर नितीन काळजे यांनी महापौरपदाचा,  तर नगरसेवक राहुल जाधव आणि शीतल शिंदे यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा सादर केला आहे. महापौर नितीन काळजे यांनी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला,  तर राहुल जाधव आणि शीतल शिंदे यांनी सभागृह नेते एकनाथ पवार यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला.

—-

आमदार लांडगे गटाचा मोरेश्वर भोंडवे यांना पाठिंबा?

महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांच्या गटातील स्थायी समिती सदस्य भाजपच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करणार नाहीत. आमदार लांडगे गटातील स्थायी समिती सदस्य मोरेश्वर भोंडवे यांना पाठिंबा देणार आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, याबाबत आमदार महेश लांडगे यांच्याकडून कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. परंतु, अशाप्रकारचा निर्णय झाला, शहरातील राजकीय पटलावरील चित्र बदलणार यात शंका नाही. विशेष म्हणजे, मोरेश्वर भोंडवे यांना शिवसेनेसुद्धा पाठींबा दिला आहे.

—-

काय म्हणाले महापौर?

शहराच्या स्थायी समिती सभापतीपदी राहुल जाधव यांना संधी देण्यात माझ्या पदाची भौगोलिक अडचण झाली असेल म्हणून आमदार महेश दादा लांडगे यांच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या वृत्तीचा आदर करुन मनापासून महापौर पदाचा राजीनामा देत आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button