द कोरियाच्या अध्यक्षांची शिक्षा वाढवली
सेऊल – दक्षिण कोरियाच्या माजी राष्ट्राध्यक्ष पार्क गेऊन यांच्या तुरूंगवासाच्या शिक्षेत तेथील उच्च न्यायालयाने एक वर्षाची वाढ केली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी आढळल्याने त्यांना 24 वर्षांच्या कारवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. ती आता 25 वर्षांची झाली आहे. तथापी त्यांना किमान 30 वर्षाच्या कारावासाची शिक्षा व्हावी अशी सरकारी पक्षाची मागणी आहे. पार्क यांना गेल्या एप्रिल महिन्यात 20 दशलक्ष डॉलर्सचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून 24 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
त्यांनी अध्यक्षपदाचा दुरूपयोग करून आपल्या धोरणांना विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबीत किंवा बडतर्फ करण्याचे कृत्य केले असून त्यांनी राजकीय विरोधक असलेल्या कलाकारांनाही काळ्या यादीत टाकले होते. देशाची महत्वाची गुप्त कागदपत्रे फोडल्याचाही त्यांच्यावर आरोप होता. त्यांच्यावरील खटला दहा महिने चालला होता. त्यात त्या अनेक बाबतीत दोषी आढळून आल्या आहेत.
मोठ्या उद्योगपतींकडून त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या रकमा उकळल्याचाहीं त्यांच्यावर आरोप होता. धनाढ्य व्यक्तींशी हातमिळवणी करून त्यांनी आपल्या अधिकाराचा दुरूपयोग केला आणि लोकशाही कलंकीत करण्याचे दुष्कृत्य केले असा ठपकाही उच्च न्यायालयाने त्यांच्यावर ठेवला आहे.