breaking-newsक्रिडा

द्रोणाचार्य पुरस्कार नाकारल्याने तेजा यांचा प्रशिक्षकपदाचा राजीनामा

द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस झाली असतानादेखील एका मागील घटनेचे कारण पुढे करीत पुरस्कार नाकारण्यात आल्याने संतप्त तिरंदाजी प्रशिक्षक जीवनज्योतसिंग तेजा यांनी भारताच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.

‘‘मी भारतीय तिरंदाजी संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. माझ्यावर झालेल्या मोठय़ा अन्यायामुळेच मी हा पवित्रा स्वीकारला आहे. मला हा पुरस्कारदेखील नको आहे. मात्र निवडीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी, अशी माझी अपेक्षा आहे,’’ असे तेजा यांनी सांगितले.

आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय तिरंदाजी संघाचे तेजा प्रशिक्षक होते. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि अर्जुन पुरस्कारप्राप्त तिरंदाज घडवण्यात त्यांचे योगदान आहे. ‘‘तिरंदाजी संघटनेकडून बेशिस्तीप्रकरणी घालण्यात आलेली एक वर्षांची बंदी आणि संबंधित घटनेच्या प्रकरणातील सर्व आरोपांतून माझे निर्दोषत्व सिद्ध झालेले आहे. ज्यात माझा काहीच दोष नव्हता, अशा प्रकरणात मला अडकवून बंदी घालण्यात आली होती. क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोडदेखील एक खेळाडू असून त्यांना अशा प्रकरणांची पूर्ण माहिती आहे. मी एक चोर असल्यासारखे मला त्यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात मी आता थेट पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडेच दाद मागणार आहे,’’ असेही तेजा यांनी नमूद केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button