मनोरंजन

“देशी गर्ल’ पुन्हा ट्रोल…

बॉलीवूडची “देशी गर्ल’ अर्थात प्रियंका चोप्राने पुन्हा एकदा “मेट गाला-2018′ या कार्यक्रमात रेडकार्पेटवर शिरकत केली. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे दरवर्षी होणाऱ्या या महोत्सवात गतवर्षीही प्रियंका सहभागी झाली होती. यावर्षी “Heavenly Bodies: Fashion and the Catholic Imagination” ही थीम ठेवण्यात आली होती.

प्रियंकाने आकर्षक असा क्रिमसन वेलवेट गाऊन परिधान केला होता. हा ड्रेस रॉल्फ लॉरेन क्‍लोदिंग कंपनीद्वारा डिझाईन करण्यात आला होता आणि त्यावर सुरेख असे दागिने चढविण्यात आले होते. या गाऊनवर तिने गोल्डन कलरचा “हेड ड्रेस’ही घातला होता. याशिवाय प्रियंकाने महरून रंगाची डार्क लिपस्टिकही लावली होती. प्रियंकाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या फोटोवर अनेकांनी ट्विट करत प्रियंकाला ट्रोल केले आहे. काही जणांनी तिच्ची खिल्ली उडवित फनी ट्‌विट केले आहेत.
“मेट गाला’ हा कार्यक्रम न्यूयॉर्क शहरातील “मेट्रोपोलिटन म्यूझियम ऑफ आर्ट’च्या “कॉस्ट्यूम इंस्टीट्यूट’ला फंड जमा करण्यासाठी आयोजित केला जातो. याच कार्यक्रमात गतवर्षी 2017मध्ये “बेवॉर्च गर्ल’ने ट्रेंच कोट परिधान करून प्रसिद्धी मिळविली होती. तेव्हीही अनेकांनी प्रियंकाला ट्रोल केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button