breaking-newsTOP Newsमहाराष्ट्रराष्ट्रिय

देशात 24 तासात कोरोनाचे तब्बल 38 हजार 903 नवे रुग्ण, तर, 543 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधित रुग्ण वाढीचा उच्चांक आज आवाक करून सोडणारा आहे. देशात पहिल्यांदाच 24 तासांत तब्बल 38 हजार 903 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 10 लाख 77 हजार 618 झाली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 543 रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात 3 लाख 73 हजार 379 सक्रिय रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 26 हजार 816 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 6 लाख 77 हजार 422 रुग्ण निरोगीही झाले आहेत. देशाचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या 10.86 टक्के आहे. तर, रिकव्हरी रेट हा 65.24% झाला आहे. देशातील सर्वात कोरोना प्रभावित राज्य आहे महाराष्ट्र आहे.

महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा 3 लाख पार

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ही ब्रिटन देशातील एकूण रुग्णांपेक्षा जास्त आहे. जर महाराष्ट्र हा देश असता, जर जगातील एकूण कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत 10वा क्रमांक असता. राज्यात शनिवारी 8 हजार 348 नवे कोरोना रुग्ण सापडले. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासांत 144 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांचा आकडा हा 11 हजार 569वर पोहचला आहे. तर, राज्यात 3 लाख 937 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर, 1 लाख 65 हजार 663 रुग्ण निरोगी झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button