देशात सलग नवव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ
नवी दिल्ली – देशात सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे दर 25 पैशांनी वधारले आहेत. त्यामुळे आज दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 89.54 रुपयांवर पोहोचली असून एक लिटर डिझेलची किंमत 79.95 रुपयांवर पोहोचली आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलचे दर 96 रुपयांवर पोहोचले आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 96 आणि डिझेलचे दर 86.97 रुपये आहेत. तसेच इतर शहरांमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दररोज विक्रमी वाढ होताना दिसत आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे. श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 100.07 रुपये दराने विकले जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. बेंचमार्क क्रूड ऑईल 63 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेलं आहे. आंतरराष्ट्रीय फ्युचर्स मार्केट इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज (आयसीई) मधील बेंचमार्क क्रूड ऑईल मंगळवारीच्या सत्रात 0.51 टक्क्यांनी वधारून 63.62 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं होतं.
देशातील प्रमुख पाच शहरातील दर
मुंबई – पेट्रोल 96 रुपये, डिझेल 86.97 रुपये
बंगळुरू – पेट्रोल 92.48 रुपये, डिझेल 84.72 रुपये
चेन्नई – पेट्रोल 91.73 रुपये, डिझेल 85.05 रुपये
कोलकाता – पेट्रोल 90.79 रुपये, डिझेल 83.54 रुपये