breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपुणे

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यात, सुनील केदार यांची घोषणा

मुंबई : देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्याच्या बालेवाडी येथे सुरू करणार असल्याची घोषणा राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी केली आहे. या विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा झाल्यानंतर शैक्षणिक सत्र 2021-22 पासून त्याचे कामकाज सुरू होणार असून, यासाठी 400 कोटींचे बजेट प्रस्तापित आहे.

सन 2020-21 च्या अर्थसंकल्पात या विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. विधेयक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात आले आणि त्यास दोन्ही सभागृहाने एकमताने मंजुरी दिली, असल्याने येत्या शैक्षणिक वर्षापासून या विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेसह अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती क्रिडामंत्री सुनील केदार यांनी दिली.

विद्यापीठ स्थापनेनंतर प्रथम वर्षी स्पोर्टस सायन्स, स्पोर्टस टेक्नॉलॉजी व  स्पोर्टस कोचिंग व ट्रेनिंग हे ३ अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. याकरिता प्रत्येक अभ्यासक्रमात ५० विद्यार्थी प्रवेश संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील वर्षामध्ये मागणीनुसार व आवश्यकतेनुसार आणखी अभ्यासक्रम सुरु करता येतील.यामुळे शारीरिक शिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यम व कम्युनिकेशन, क्रीडा प्रशिक्षण यामध्ये शिक्षणाच्या व नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, क्रीडा क्षेत्रातील तांत्रिक मनुष्यबळ देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. शारीरिक शिक्षण, क्रीडा शिक्षण यामध्ये संशोधन व विकास चांगल्या प्रकारे होईल, असे केदार म्हणाले.

वाचाः पुढील 2 वर्षात देश टोलनाकामुक्त होणार – नितीन गडकरीं

राज्यात सध्या पुणे जिल्ह्यातील बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडा संकुल सुरु आहे. या क्रीडा संकुलात विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. या सुविधांचे अद्ययावतीकरण तसेच नवीन सुविधा उपलब्ध करण्याची कार्यवाही सातत्याने होत असते. यामुळे हे विद्यापीठ सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे कार्यान्वित करण्यात येणार आहे व नंतरच्या कालावधीत या विद्यापीठाकरिता स्वतंत्र इमारत बांधकाम करण्यात येईल. यासाठी अनावर्ती खर्च 200 कोटी रुपये व विद्यापीठ कॉर्पस फंडसाठी 200 कोटी रुपये याप्रमाणे एकुण 400 कोटी रुपये  खर्च अपेक्षित असल्याचे केदार यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button