breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

देवेंद्र फडणवीस यांच्या शालेय जीवनातील आठवणींना चिंचवडमध्ये मिळाला उजाळा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

शालेय जीवनात नाटकांमध्ये भाग घेण्यास अवडायचे. त्यातही सुदैवाने दोनवेळा राजकीय नेत्यांच्या भूमिका साकारण्याची संधी वाट्याला आली. महाविद्यालयीन जीवनात रामदास आठवले यांच्यासारख्या कविता सुध्दा करत असल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना चिंचवड येथील सभागृहात उजाळा दिला.

स्वभावीकपणे मी शांत आहे. पण, अनेकांना तसे वाटत नाही. लहान असताना मी खोड्या करत नव्हतो. पण, खोड्यांचा साक्षीदार असायचो. मी ‘सीझनल’ खेळ खेळायचो. बॅटिंग केली की मी फिल्डिंग करत नव्हतो. पळून जात होतो, अशा आठवणींना फडणवीस यांनी उजाळा दिला. तसेच मी ‘मोरया युथ फेस्टिव्हल 2020’च्या कार्यक्रमाला पुन्हा येईन’ असे सांगताच सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.

कर्तव्य फाऊंडेशन संस्थेच्या वतीने शहरातील युवक युवतींना सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रात आपल्यातील गुण कौशल्य सादर करण्यासाठी आयोजित ‘मोरया युथ फेस्टिव्हल 2020’चे उद्घाटन आज शनिवारी (दि. 11) त्यांच्या हस्ते झाले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात फडणवीस यांची सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर आणि सचिन पटवर्धन यांनी मुलाखत घेतली.

फडणवीस म्हणाले की, चांगले वाईट समजणे हा संस्काराचा भाग असतो. संघामध्ये आम्हाला देशभक्तीचे धडे मिळाले. ज्यांच्यासोबत राहतो त्यांच्याकडून चांगले गुण, संस्कार घेता येतात. “माझ्यावर शिक्षणासाठी घरातून कोणाचे प्रेशर नव्हते. 11 महिने उनाडक्या केल्या आणि परीक्षेच्या आधी एक महिना अभ्यास केला, याच पध्दतीचा अवलंब कायम करायचो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button