breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दृष्टिहीन मुलींच्या संघाने डोळस मुलींच्या संघावर मात करत जिंकला सामना

पिंपरी –  जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वास असलाकी विजय मिळविता येतो याचा प्रत्यय मंगळवारी पिंपरी-चिंचवड मधील क्रिकेट रसिकांना आला.त्याला कारणही तसेच होत.प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाइंड व चिंचवड-पिंपरी ‘जितो’ यांनी आयोजित केलेल्या ‘प्रेरणा चषक’ क्रिकेट सामन्यात दृष्टिहीन मुलींच्या संघाने डोळस मुलींच्या संघावर मात करत सामना जिंकला.पडत-धडपडत त्यांनी विजय मिळवला. विजयाचा जल्लोष साजरा झालाध उपस्थितांची मने ही जिंकली.

दृष्टिहीन व्यक्ती व डोळस व्यक्ती यांच्यात मैत्रीचे नाते घट्ट व्हावे व दृष्टिहीन व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात यशस्वी जीवन जगता यावे या साठी प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाइंड यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.सध्या सर्वत्र क्रिकेट फीवर सुरू आहे. भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेच्या तयारीत आहे.त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना ४६ वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पिंपरीतील आण्णा साहेब मगर मैदानावर दृष्टिहीन मुली व डोळस मुलींच्या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.

या क्रिकेट सामन्यात दृष्टिहीन संघाने सहा षटकात तीन बाद ४६  धावा केल्या.जितो संघाच्या डोळस मुलींनी या धावांचा पाठलाग करताना सहा षटकात ३६ धावा केल्या.अत्यंत चुरशीच्या या सामन्यात प्रेरणा दृष्टिहीन संघाने दहा धावांनी विजय मिळवीत प्रेरणा चषक व ११ हजारांचे पारितोषिक मिळविले.दृष्टिहीन संघाच्या  किरण तलवार हिने सर्वाधिक २३ धावा करत सर्वांची मने जिंकली.कर्णधार ज्योतीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.सहा षटकात निर्णायक धावसंख्या करत त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यात यश मिळविले.

हा सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येत प्रेक्षक उपस्थित झाले होते.विजया नंतर दृष्टिहीन संघाने जल्लोष केला.त्यांच्या चेह?्यावर विजयाचा आनंद पाहून उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.प्रेरणा परिवाराचे सदस्य व जितो चे पदाधिकारी कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.

प्रेरणा परिवाराचा आयकॉन असणा?्या सचिन तेंडूलकरचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. या प्रसंगी भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषक स्पधेसार्ठी शुभेच्छा देण्यात आल्या.आदिनाथ क्रिकेट क्लब च्या खेळाडूंनी या सामन्यासाठी सहकार्य केले.जितो च्या अध्यक्ष संतोष धोका,राजेंद्र जैन यांच्या सह प्रेरणा परिवाराचे विश्वास काशीद,नितीन शिंदे,कविता स्वामी,अमित जाधव,सचिन साकोरे,खंडूदेव कठारे,राहुल लुंकड,आदित्य जाधव,चिराग चोरडिया,शितल शिंदे,माधुरी कुलकर्णी,राजेंद्र गावडे,मनीषा आबळे,दिलावर शेख,सुनील रांजने,नीता घोरपडे यांनी योगदान दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button