breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

दूरदर्शनवरील सुपर हिरो शक्तिमान सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला

कोरोना व्हायरसमुळे देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे विविध राज्यांचे मुख्यमंत्री लॉकडाऊनचे पालन काटेरोरपणे करण्याचे आवाहन करत आहेत. कोरोनापासून वाचवण्यासाठी तोच एकमेव पर्याय आहे.

पंतप्रधान असं म्हणाले होते की, जर लॉकडाऊनचं पालन केले नाही, तर कोणत्या संकटाला सामोरे जावे लागेल, याचा अंदाज नाही लावू शकत. अशा परिस्थितीत काहीजण वर्क फ्रॉम होम करत आहेत तर अनेकांना कामाशिवाय घरी बसावे लागले आहे. अशावेळी लोकांनी मागणी केल्यामुळे 80 आणि 90 च्या दशकातील दूरदर्शन प्रसिद्ध मालिका पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्या आहेत.

त्या काळात गाजलेल्या रामायण, महाभारत, ब्योमकेश बक्शी आणि सर्कस या कार्यक्रमानंतर नागरिकांसाठी आणखी एक खूशखबर आहे. दूरदर्शनवरील सुपर हिरो शक्तिमान सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. शक्तिमानची भूमिका करणारे यांनी यासंदर्भात एक हिंट दिली आहे.

शक्तिमानची प्रसिद्ध भूमिका करणारे आणि त्या काळात अनेकांना ‘Sorry शक्तिमान’ म्हणायला लावणारे मुकेश खन्ना यांनी नुकतीच माहिती दिली आहे की, शक्तिमानसाठी लोकांची मागणी वाढत आहे. त्यामुळे शक्तिमानचा सिक्वेल येणार आहे. या सिक्वेलवर गेल्या 3 वर्षांपासून काम सुरू आहे. हा प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे, कारण प्रेक्षकांना उत्सुकता आहे की पुढे शक्तिमानमध्ये काय घडलं, अशी माहिती खन्ना यांनी दिली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button