breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

दूध भुकटी निर्मितीकरीता प्रतिलिटर 3 रुपये अनुदान

  • राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय 

मुंबई – दूध उत्पादकांना योग्य दर देता यावा यासाठी सहकारी व खासगी दूध भुकटी प्रकल्पधारकांना दूध भुकटी उत्पादित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दुधाला प्रतिलिटर 3 रुपये अनुदान देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाने घेतला. या निर्णयामुळे दूध उत्पादकांना निश्‍चितपणे योग्य दर मिळेल, असा विश्वासही दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला.

राज्यात सध्या अतिरिक्त दुधाचे उत्पादन झालेले आहे. याच काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे दरही घसरलेले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरलेल्या दूध भुकटीच्या दरामुळे दूध भुकटी प्रकल्पधारक अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत दूध भुकटी प्रकल्पधारक दूध भुकटी निर्मितीकरीता शेतकऱ्यांकडून कमी दराने दूध खरेदी करतात. याचा थेट परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होतो, असे ते म्हणाले.
मार्च 2018 अखेर रोजी 26506.70 मे.टन इतका दूध भुकटी साठा शिल्लक आहे. या परिस्थितीचा प्रतिकूल परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होऊ नये यासाठी दूध भुकटी प्रकल्पधारकांना अधिक दूध भुकटी उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

यानुसार शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील 30 दिवसांच्या कालावधीमध्ये मार्च 2018 मध्ये उत्पादित केलेल्या दूध भुकटीपेक्षा किमान 20 टक्के अधिक दूध भुकटीचे उत्पादन करणाऱ्या सहकारी व खासगी दुध भुकटी प्रकल्पधारकांना दूध भुकटी बनविण्याकरिता वापरलेल्या दूधासाठी प्रति लिटर 3 रुपये इतके प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल, असे जानकर यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button