breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखलीत दुकानांची तोडफोड; भाजपचे क्रिडा सभापती संजय नेवाळे यांच्यावर गुन्हा

पिंपरी –  पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रभाग क्रमांक 11 मधील भाजपचे नगरसेवक आणि कला, क्रिडा, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती संजय नेवाळे यांच्यासह सात जणांवर दुकानाची तोडफोड आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.  ही घटना रविवारी (ता.3) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास शिवतेजनगर, चिखली येथे घडली आहे.

दुकानाची तोडफोड, मारहाण केल्याप्रकरणी संजय नेवाळे, सचिन किरवे,  इतर पाच अनोळखी व्यक्‍ती अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. बदाराम भिकाजी देवासी (वय 24, रा. चेरी स्वीट मार्ट, शिवतेजनगर, चिखली. मूळगाव पाली, राजस्थान) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवासी हे चेरी स्वीट मार्टमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांनी त्यांच्या दुकानासमोर चायनीज, ज्यूस आणि पाणीपुरीचा स्टॉल लावला आहे. रविवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास नेवाळे हे आपल्या कार्यकर्त्यांसह तिथे आले. त्यांनी देवासी यांना चायनीज, पाणीपुरी आणि ज्यूस सेंटर हे दुकानासमोर लावायचे नाही, असे सांगितले. यामुळे देवासी यांनी मालकाला फोन करून नेवाळे यांचा निरोप राजस्थानी भाषेत सांगत होते. त्यावेळी नेवाळे यांच्यासोबत आलेली व्यक्‍ती बाजूला उभी होती. त्याने देवासी यांच्या दोन-तीन कानाखाली मारल्या आणि नेवाळे यांना “हा तुमच्याबाबत काय सांगतोय बघा, असे म्हणाला. त्यानंतर नगरसेवक संजय नेवाळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी देवासी यांना लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण करीत दुकानाची तोडफोड केली. या मारहाणीत गळ्यातील चेन आणि कानातील सोन्याची बाळी पडून नुकसान झाले. हा प्रकार सीसी कॅमेऱ्यात रेकॉर्ड होत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या वायरिंगचीही तोडफोड केली.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत ना भय ना भ्रष्टाचार असे ब्रीद वाक्य घेवून भारतीय जनता पार्टीने महापालिकेत सत्ता मिळविली. मात्र, महापालिकेचे क्रीडा सभापती संजय नेवाळे हे कार्यकर्त्यासह चिखली परिसरात दादागिरी करु लागले आहे. तसेच आतापर्यंत भाजपच्या नगरसेवक तुषार हिंगे, तुषार कामठे, सुजाता पालांडे यांच्यावरही वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले आहे. त्यामुळे भाजपच्या सत्तेत जनता सुरक्षित राहिली नसल्याचे यावरुन दिसू लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button