दुःखद! रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना मातृशोक
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या आई चंद्रकांता गोयल यांचे शनिवारी निधन झाले. पीयूष गोयल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. “आपल्या स्नेह व प्रेमाने मला नेहमी मार्ग दाखवणारी माझी आदरणीय आई आज सकाळी स्वर्गवासी झाली. त्यांनी आपले संपूर्ण जीवन सेवा करत व्यतित केले व आम्हाला देखील सेवाभावाने जीवन व्यतित करण्यासाठी प्रेरित केले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास आपल्या चरणाशी स्थान देवो, ॐ शांती..” असं पीयूष गोयल यांनी ट्विट केलं आहे.
अपने स्नेह, और प्रेम से मुझे हमेशा राह दिखाने वाली मेरी पूज्य माता जी का आज सुबह स्वर्गवास हो गया।
— Piyush Goyal (@PiyushGoyal) June 6, 2020
उन्होंने अपना पूरा जीवन सेवा करते हुए बिताया, और हमें भी सेवाभाव से जीवन बिताने को प्रेरित किया। ईश्वर उन्हें अपने श्री चरणों मे स्थान दें। ॐ शांतिः pic.twitter.com/mwlIks6TBJ
चंद्रकांता गोयल या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या होत्या. शिवाय, माटुंगा मतदारसंघातून त्या विधानसभेवर देखील गेल्या होत्या.