breaking-newsताज्या घडामोडीपुणे

दीपक मानकर, साधना वर्तक यांच्यावर भूखंड प्रकरणी आणखी एक गुन्हा

पुणे : “मोका’तंर्गत तुरुंगात असलेले माजी उपमहापौर दीपक मानकर तसेच ऍड. साधना वर्तक यांच्यासह तिघांवर कोथरूड पोलिस ठाण्यात बनावट कागदपत्रे तयार करून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शनिवारी रात्री कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

या प्रकरणी प्रभात रस्त्यावर राहणाऱ्या एका 52 वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार मानकर, त्यांची निकटवर्तीय अॅड. वर्तक आणि मुकुंद परशुराम दीक्षित यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित महिलेने तिचा भूखंड विकसित करण्यासाठी मानकर यांना 2003 मध्ये दिला होता.

दरम्यान, मानकर यांनी त्या महिलेचा दीर मुकुंद दीक्षित यांच्याकडूनही एक जागा घेतली. त्याचा मोबदला देण्याऐवजी त्यांनी त्या महिलेच्या जागेची बनावट कागदपत्रे तयार करून मुकुंद दीक्षित यांना दिली. तसेच त्या महिलेची आणखी एक जागा बळकावली, असेही तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण व्यवहारात संबंधित महिलेची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या प्रकरणाचा तपास सुरू होता. त्यानंतर शनिवारी रात्री कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button