breaking-newsपिंपरी / चिंचवड

दिव्यांगांना कृत्रीम अवयव वाटप

सांगवी – आधार मिळावा आणि स्वावलंबी होण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप सोशल फाउंडेशनने हात-पायांचे मोजमाप घेऊन दहा दिव्यांगांना कृत्रीम हात-पाय (जयपूर फूट) त्यांच्या वाटप केले.

जुनी सांगवी येथील प्रवीण जाधव यास आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते कृत्रीम पाय (जयपूर फूट) देण्यात आला व संजय गांधी योजनेअंतर्गत पेंशन सुरू करण्यात आली. कोणत्याही दिव्यांगास मदतीची आवश्‍यकता असेल तर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जगताप यांनी यावेळी केले आहे. ते म्हणाले, मनुष्याला निसर्गाने दिलेले सर्वच अवयव आवश्‍यक आहेत. दुर्दैवाने अनेकांना अपघात किंवा इतर काही कारणांमुळे हात-पाय गमवावे लागतात.

मनुष्याचे एक बोट जरी जायबंदी किंवा निकामी झाले, तरी दैनंदिन काम करताना अडचणी येतात. काही लोकांना तर आख्खा हात, पाय किंवा दोन्ही हात व पाय गमवावे लागतात. दिव्यांग शरीराने अधू असली तरी त्या मनाने कुठेही खचलेली नसते. अशा घटकांसाठी काही तरी करावे, या उद्देशाने आमदार लक्ष्मण जगताप ट्रस्ट मदत करते. यावेळी शहर प्रवक्‍ते अमोल थोरात, स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, देवीदास पाटिल, प्रमोद ताम्हणकर, अदिती निकम, आकाश वाघमारे उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button