breaking-newsपिंपरी / चिंचवड

दिव्यांगांच्या कल्याणासाठी नियमावली बदला, युवक काँग्रेसची महापालिकेकडे मागणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिचंवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज दिव्यांग विद्यार्थ्यासोबत महापालिका अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची भेट घेतली. दिव्यांगासाठी असलेल्या नियमावलीत बदल करत विद्यार्थ्यांच्या बस पास संदर्भात असलेल्या कागदोपत्री अडचणी दूर करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिचंवड महापालिका अपंग कल्याणकारी योजनेअंतर्गत नागरवस्ती विभाग व पीएमपीएमएलकडून सन २०११ पासून देण्यात येत असलेल्या दिव्यांग विद्यार्थी बस पास सवलतीसाठी आपल्या नागरवस्ती विभागाकडून घेण्यात येत असलेल्या अतिरिक्त कागद पत्रांच्या मागणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना अत्यावश्यक असणारी बस पास सवलत नाकारली जात आहे. याबाबत दिव्यांग बांधवांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत.

नागरवस्ती विभागाकडून मागणी होत असलेले रहिवासी पुराव्याबाबतचे  रेशन कार्ड, लाईट बिल व नोटरी-शपथपत्र न मागता संबंधित विद्यार्थ्यांचे संगोपन करणा-या संस्थेचे पत्र, काॅलेजचे बोनाफाईड, ओळखपत्र किंवा नोकरी करत असल्यास कंपनीचे ओळखपत्र  ग्राह्य धरून बस पास मिळावेत ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

यावर सकारात्मक प्रतिसाद देत अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधत अडचणी समजावून घेतल्या. या प्रसंगी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शहर युवक काँग्रेस सरचिटणीस निखिल भोईर, युनूस बागवान, सिध्दार्थ वानखेडे, पिपंरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षचे हिराचंद जाधव, अनिल सोनकांबळे, सुभाष वाघमारे व दिव्यांग विद्यार्थी गीतेश चौधरी, बळीराम धराडे, बालाजी सुर्यवंशी, शंकर भोईटे व शिवकुमार कांबळे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button