breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अधिकारी, कर्मचा-यांनो दिवाळी गिफ्ट घेताय ? सावधान ! अन्यथा कारवाई अटळ

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिवाळीचे गिफ्ट स्वीकारणा-या अधिकारी व कर्मचा-यांना चांगलाच चाप लावला आहे. अधिकारी, कर्मचा-यांनी ठेकेदार, नागरिक, अन्य कोणत्याही व्यक्ती, अथवा कोणत्याही संस्थांकडून भेटवस्तू किंवा देणग्या स्वीकारल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

अवघ्या आठ दिवसांवर दिवाळीचा सण आलेला आहे. प्रशासकीय कामे करून देणा-या महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांना खूश करण्यासाठी ठेकेदार, बिल्डर, नागरिक काही संस्थांचे प्रतिनिधी मोठमोठी गिफ्ट देतात. काहींना बंद पाकिटात मोठ्या रक्कमेच्या देणग्या दिल्या जातात. या भेट वस्तू घेऊन महापालिकेत येणा-यांना मज्जाव करण्याचे निर्देश आयुक्तांनी सुरक्षा विभागाला दिले आहेत. महापालिकेत कुठल्याही प्रकारची भेटवस्तू स्वीकारण्यास सक्त मनाई करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व विभागातील अधिकारी, कर्मचा-यांना दिले आहे.

बांधकाम परवाना, लेखा स्थापत्य विभाग, पाणीपुरवठा विभागांमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध भेटवस्तू येण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. परंतु, भेटवस्तू स्वीकारणे लोकाभिमुख प्रशासनासाठी बाधक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांने त्यांच्याशी कार्यालयीन व्यवहार असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून, औद्योगिक किंवा वाणिज्य संस्थाकडून संगटनांकडून वारंवार केला जाणारा पाहुणचार टाळवा. नागरिक, ठेकेदार, अन्य कोणत्याही व्यक्ती, अथवा कोणत्याही संस्थाकडून देणग्या, भेटवस्तू स्वीकारु नयेत. महापालिकेतील कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्या कुटुंबीयांतील व्यक्ती, त्याच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तीला भेट वस्तू स्वीकारण्याची परवानगी देवू नये, असे परिपत्रक आयुक्तांनी काढले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button