breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

दिवाळी गर्दीने कोंडी

महात्मा फुले मंडईपासून खोळंबा

दिवाळीच्या खरेदीसाठी शनिवारी संध्याकाळी बाजारपेठांमध्ये झुंबड उडाल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. दिवाळीआधीचे काही दिवस संध्याकाळी खरेदीसाठी गर्दी होते. वाहनांची संख्या, रहदारीचा अंदाज घेत वाहतूक पोलिसांनी आधीपासूनच जादा बंदोबस्त ठेवला होता. तरीही वाहतूक कोंडी झालीच.

कंदील-पणत्यांसह निरनिराळ्या भेटवस्तू, रोषणाईचे साहित्य, कपडे यासह अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी महात्मा फुले मंडई  (क्रॉफर्ड मार्केट) आणि परिसरातील दुकानांमध्ये गर्दी उसळली. परिणामी शहरातून बाहेर पडणाऱ्या आणि शहराकडे येणाऱ्या सर्वच मार्गावर वाहतूक कोंडी झाली. शहराकडे येणारा पूर्व मुक्त मार्ग डि’मेलो मार्गावर उतरेपर्यंत मोकळा होता. मात्र, तेथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फोर्ट किंवा चर्चगेटकडे जाण्यासाठी तब्बल एक तासाहून जास्त वेळ लागत होता. मात्र शुक्रवारच्या मानाने वाहतूक कोंडी झाली नाही, तर वाहतूक थोडी मंदावली होती, असा दावा वाहतूक पोलीस उपायुक्त (शहर) दिपाली मसीरकर यांनी केला.

मसीरकर यांनी सांगितल्यानुसार, एरवीही मंडईच्या आसपास गर्दी असते. शनिवारी अनेक आस्थापनांना सुटी असल्याने दुपारपासून खरेदीसाठी येथे गर्दी होऊ लागली. पादचारी आणि मंडई परिसरातील वाहनांची संख्याही नेहमीपेक्षा वाढली. गर्दी होणार हा अंदाज बांधून आम्ही बंदोबस्त ठेवला होता आणि वाहतूक मार्गाचे फेरनियोजन केले होते.

कोंडी कुठे कुठे?

  • महात्मा फुले मंडईजवळ, महम्मद अली मार्गावर फटाक्यांची घाऊक बाजारपेठ आहे. तेथे चार दिवसांपासून खरेदी सुरू आहे. शनिवारी संध्याकाळी या गर्दीत आणखी भर पडली.
  • दादर भागातही शनिवारी संध्याकाळी खरेदीसाठीची गर्दी होती. त्यामुळे या भागातून संथ गतीने वाहतूक पुढे सरकताना दिसली.
  • उपनगरांमधील चेंबूर, कुर्ला, वांद्रे यासह ठिकठिकाणच्या छोटय़ा-मोठय़ा बाजारपेठांमध्ये गर्दी असल्याने त्या त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी दिसून आली.

पश्चिम उपनगरात मॉल, बाजारपेठा, फटाक्यांच्या घाऊक बाजारपेठांजवळ कोंडी होऊ नये यासाठी बंदोबस्त आणि नियोजनाकरिता अधिकचे मनुष्यबळ रस्त्यांवर आहे. योग्य ती खबरदारी घेतली जात असून उपाययोजना करण्यात आल्या आहेत.     – शशी मीना, वाहतूक पोलीस उपायुक्त (पश्चिम उपनगरे)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button