breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिवंगत महापौर भिकू वाघेरे (पाटील) प्रतिष्ठानतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन  

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर दिवगंत भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त भिकू वाघेरे प्रतिष्ठानच्या वतीने पिंपरीत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  यंदा ‘पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार’ स्माईल सोशल फौंऊंडेशनचे योगेश मालखरे व वाल्मिकी कुटे यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष चंद्रकांत गव्हाणे, सचिव बाळासाहेब वाघेरे, सदस्य पंडित कापसे, पोपट महाराज इंगळे, विलास व-हाडे, स्वप्निल सुर्वे, हणमंत वाघेरे, सागर वाघेरे, विलास गव्हाणे, केतन वाघेरे, शुभम वााघेरे आदी उपस्थित होते.
पिंपरीत बुधवारी (दि. ६) सकाळी 9 वाजता महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे हस्ते कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, माजी आमदार विलास लांडे, महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर मंगला कदम, नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर, संदीप वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते योगेश बहल, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, उधोजक विजय काटे, पवना सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी वाघेरे, माजी नगरसेवक हनुमंत नेवाळे, रंगनाथ कुदळे  आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच  सकाळी 10 ते दुपारी 1  वाजेपर्यंत नवहाराष्ट्र विद्यालयाच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजित केले आहे. या पुरस्कारात स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ  व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप आहे, असेही वाघेरे यांनी सांगितले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button