breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले,8 फेब्रुवारीला मतदान…

  • आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजपा तिहेरी लढत

दिल्ली | महाईन्यूज |

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ८ फेब्रुवारी रोजी दिल्लीत मतदान पार पडणार असून ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. दिल्लीत आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजपा अशी तिहेरी लढत पहायला मिळणार आहे …

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे आजपासून म्हणजेच 6 जानेवारी 2020 पासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही निवडणूक आयोगाने यावेळी केली. दिल्लीत एक कोटी ४६ लाख मतदार आहेत. 2015मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला बहुमत मिळालं होतं. आम आदमी पार्टीने 67 जागांवर विजय मिळवला होता. तीन जागा भाजपच्या खात्यात गेल्या होत्या. काँग्रेसला मात्र एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत.आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. तसेच या निवडणुकीत 1 कोटी 46 लाख मतदार मतदान करणार असल्याचेही त्यांनी सांगितले

आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे –
– दिल्लीत आजपासून आचारसंहित लागू
– २२ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे
– निवडणुकीसाठी १४ जानेवारी रोजी नोटिफिकेशन जारी केलं जाईल
– उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २१ जानेवारी अंतिम तारीख
– ८ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल.
– ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल
– अॅपच्या माध्यमातून आचारसंहितेचं उल्लंघन केलेल्या तक्रारींची नोंद घेतली जाईल
– निवडणुकीत १,४६,९२,१३६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील
– निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी ९० हजार कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात येणार आहे
– २६८९ जागांवर एकूण १३७५० मतदान केंद्र असणार आहेत

दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच दिल्लीत मात्र राजकीय वातावरणं चांगलंच तापलं आहे. सोबतच दोन मुद्द्यांवर गूढ कायम आहे. एक म्हणजे या निवडणुकीत भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार ? आणि दुसरं म्हणजे सुधारित नागरिक्तव कायद्याचा निवडणुकीत काय परिणाम होईल?.

दिल्लीत आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजपा अशी तिहेरी लढत पहायला मिळणार आहे. आम आदमी पक्षाकडून अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारी असणार आहेत. भाजपाने मात्र अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही. दिल्लीच्या निवडणुकीत यावेळी सुधारित नागरिक्तव कायदा आणि जेएनयू हिंसाचार दोन महत्त्वाचे मुद्दे ठरणार आहेत. दरम्यान २२ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. 14 जानेवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारिख 21 जानेवारी असणार आहे. तसेच या उमेदवारी अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी होणार आहे. जर एखाद्या उमेदवारास अर्ज मागे घ्यायचा असेल तर त्याची शेवटची तारिख 24 जानेवारी असणार आहे.

दरम्यान राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार सत्तेवर होते.झारखंडच्या विधानसभा निवडणुकीनंतर या राज्यात बदल झालेला दिसून आला. भाजपाचा सत्तेतून पायउतार झाला आहे. देशात होत असलेल्या बदलाच्या प्रवाहात झारखंडही सहभागी झालं आणि झारखंमध्ये भाजपाला पराभव स्विकारावा लागला…सुधारित नागरिकतत्व कायद्या्याच्या मुद्द्यावरून झारखंड विधानसभेच्या निवडणूकित भाजपावर झालेला परिणाम दिसून आलाच…मात्र आता हे प्रकरण शांत होत नाही तोवर रविवारी जएनयूच्या विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला यावरूनही बरेच आरोप आणि प्रत्यारोप होताना पहायला मिळतायत…या निवडणुकीत भाजपावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता दाट आहे… एकीकडे भाजपा आक्रमकतेने मुद्दे मांडत असताना आम आदमी पक्ष मात्र सांभाळून पावलं उचलत आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button