breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्ली निवडणूक | उपमुख्यमंत्री सिसोदियांकडे कार नाही, 8 वर्षांत संपत्ती अर्ध्यावर ; तर पत्नीची प्रॉपर्टी तिपटीने वाढली

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी एक बाइक रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. एकीकडे सिसोदिया यांनी आपली संपत्ती गेल्या 8 वर्षांत निम्मी झाल्याचे नमूद केले आहे. तर दुसरीकडे त्यांच्या पत्नीची संपत्ती चक्क तीन पटीने वाढली आहे.

सिसोदिया यांनी 2013 च्या विधानसभा निवडणुकीत आपले वार्षिक उत्पन्न 5 लाख 21 हजार रुपये असल्याचे सांगितले होते. 2018-19 या आर्थिक वर्षात आता आपले उत्पन्न केवळ 2 लाख 45 हजार 827 रुपये असल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या पत्नीकडे 65 लाख रुपये किमतीचे मयूर विहार-2 पॉकेट बी येथे फ्लॅट आहे. तर गेल्या निवडणुकीत त्यांनी आपल्याकडे 20 लाख रुपयांचे एक फ्लॅट असल्याचे सांगितले होते. हा फ्लॅट यंदाच्या तपशीलात नाही. तसेच मनीष सिसोदिया यांनी आपल्याकडे एकही कार नाही असे म्हटले आहे. तर गेल्या निवडणुकीत त्यांनी आपल्याकडे दोन कार असल्याचे सांगितले होते. या पती-पत्नीवर कोर्टात 5 प्रकरणे प्रलंबित असल्याचे सुद्धा नमूद करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button