breaking-newsराष्ट्रिय

दिल्लीत आयकर विभागाची धाड, 100 लॉकर्समधून 25 कोटींचं घबाड जप्त

दिल्लीमधील चांदनी चौक परिसरात आयकर विभागाने धाड टाकत 25 कोटींची रक्कम जप्त केली आहे. आयकर विभागाने जवळपास 100 लॉकर्सची तपासणी करत ही रक्कम जप्त केली आहे. आयकर विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एकूण आठ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले.

प्राथमिक तपासात हवाला व्यवसायिक आपले पैसे लपवून ठेवण्यासाठी या खासगी लॉकर्सचा उपयोग करत होते अशी माहिती आयकर विभागाच्या सुत्रांकडून मिळाली आहे. है पैसे राजधानीमधील काही हाय प्रोफाईल लोकांचे असल्याचं कळत आहे. यामध्ये तंबाखू व्यवसायिक, केमिकल व्यवसायिक आणि ड्राय फ्रूट डिलर्सचा समावेश आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यवसायिकांचा हवाला ट्रेडिंगमधअये सहभाग असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे संबंध आहेत. तपास यंत्रणांनी केलेली या वर्षातील ही तिसरी मोठी कारवाई आहे. सप्टेंबर महिन्यात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) 700 कोटींच्या दुबईशी संबधित हवाला रॅकेटची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करत 29 लाखांची रोख रक्कम आणि काही महत्त्वाची कागदपत्रं जप्त केली होती.

ही कारवाई दुबई स्थित हवाला ऑपरेटर पंकज कपूर याचे व्यवसाय आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहाराशी संबंधित असल्याचं सुत्रांकडून समजलं होतं. तपास यंत्रणा त्याची चौकशी करत आहे. जानेवारी महिन्यात आयकर विभागाने खासगी लॉकरमधून 40 कोटींची रक्कम जप्त केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button