breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

केंद्र सरकराच्या कृषी कायद्याविरूद्ध दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन मागील 26 दिवसांपासून सुरू आहे. यातच आता हरयाणा सरकारने आंदोलक शेतकऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी 13 शेतकऱ्यांवर हत्या आणि दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांविरोधात अंबाला येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवत असलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी अंबाला शहरात आले होते. यावेळी त्यांचा ताफा अडवून सरकारविरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला. काही शेतकऱ्यांनी ताफ्याच्या दिशेने लाठ्याही फेकल्याचं पोलिसांनी सांगितलं.

शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याने काँग्रेसने टीका केले असून, हरयाणा सरकारने शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करून सर्व मर्यादा ओलांडल्या असल्याची टीका हरियाणाच्या काँग्रेस प्रमुख कुमारी शैलजा यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button