breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल

दिल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १४ सप्टेंबर रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

कोरोनाची लागण झाल्यानंतर मनिष सिसोदिया आपल्या घरी होम क्वारंटाईन होते. परंतु त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची ऑक्सिजनची पातळीदेखील कमी होती. यापूर्वी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात भरती केले होते. सत्येंद्र जैन यांनी कोरोनावर मात केली आहे.

मनिष सिसोदिया यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालय मेडिकल बुलेटीनच्या माध्यमातून सिसोदिया यांच्या प्रकृतीची माहिती देणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राजधानीमध्ये दिवसाला ४ हजारहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत.

१४ सप्टेंबरला मनिष सिसोदिया यांनी ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांना आपापली कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button