breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दापोडीत घरेलू महिला कामगार काँग्रेसची बैठक कामाचा आढावा

पिंपरी । प्रतिनिधी

दापोडी येथे काँग्रेस कार्यकर्ते व असंघटित कामगार काँग्रेस संलग्न घरेलू महिला कामगार काँग्रेस यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीचे आयोजन पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे सरचिटणीस भाऊसाहेब मुगुटमल व महाराष्ट्र प्रदेश घरेलू महिला कामगार काँग्रेस समन्वयक शितल कोतवाल यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली.

सदर बैठकीत नाना पटोले यांची प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याच प्रमाणे रमेश बागवे, मोहन जोशी यांची प्रदेश कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच अनंतराव गाडगीळ यांची संसदीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली. त्यांचा देखील अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.

सदर बैठकीस राजू गडकरी, किशोर सोज्वळ, मालन गायकवाड, शशिकला पोटफोडे, बी. आर. वाघमारे, सोमनाथ गायकवाड, रेणुका कणसे यांनी आपले विचार मांडले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button