breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

“दाखवण्यात आलेला फोटो शाहू महाराजांचा नव्हता मात्र ज्या राजाचा आहे त्यांचीही मी माफी मागतो”- निलेश साबळे

‘चला हवा येऊ द्या’ च्या  संपूर्ण टीमविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. या कार्यक्रमाच्या एका भागात महापुरुषांचा अपमान केल्याचा आरोप सोशल मीडियावर होत आहे. या प्रकरणी निलेश साबळे आणि  झी मराठी वाहिनीनं माफी मागावी अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी  केली होती. त्यानंतर कार्यक्रमाचे सुत्रसंचालक  निलेश साबळे यांनी माफी मागितली आहे. महापुरुषांचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता, तो पूर्वीही नव्हता आणि भविष्यातही नसणार असं  साबळे यांनी म्हटलं आहे. 

‘या कार्यक्रमात दाखण्यात आलेल्या एका दृश्यानं अनेक गैरसमज झाले. ते प्रहसन वेगळं होतं, त्यामध्ये तो फोटो वेगळ्या अर्थानं आणि वेगळ्या कारणानं दाखवण्यात आला होता. कोणत्याही महापुरुषांचा किंवा महान व्यक्तींचा अपमान करण्याचा आमचा उद्देश नव्हता, तो पूर्वीही नव्हता आणि भविष्यातही नसणार. यामुळे वाद आणि गैरसमज  झाले म्हणूनच मी सर्वांसमोर आलो आहे’, असं निलेश साबळेंनी म्हटलं आहे.

या कार्यक्रमातील प्रहसनात दाखवण्यात आलेला फोटो शाहू महाराजांचा नव्हता मात्र ज्या राजाचा आहे त्यांचीही मी मनापासून माफी मागतो. ती तांत्रिक चूक होती त्यामुळे मी दिलगीरी व्यक्त करतो असं साबळेंनी म्हटलं आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button