breaking-newsआंतरराष्टीयमुंबई

दाऊद इब्राहिमसह १३९ जण दहशतवाद्यांच्या यादीत

वॉशिंग्टनः  अमेरिकेनंतर आता संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांची यादी जारी केली आहे. यात मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदसह १३९ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा समावेश आहे. त्यामुळे दहशतवादाच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला पुन्हा एकदा जबर झटका बसला असल्याचे दिसत आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या यादीत पाकिस्तानात राहणाऱ्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. पाकिस्तानमध्ये राहून हे दहशतवादी संघटनांची सूत्र हालवत आहेत आणि दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय आहेत, असे वृत्त डॉन न्यूजने दिले आहे. यादीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकरचेही नाव आहे. दाऊदजवळ वेगवेगळ्या नावाचे अनेक पाकिस्तानी पासपोर्ट आहेत. हे पासपोर्ट कराची आणि रावळपिंडीतून जारी करण्यात आले आहेत. तसेच दाऊदचा कराचीत नुराबाद येथील डोंगराळ भागात आलिशान बंगला आहे, असेही संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.

यादीत पहिले नाव लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि ओसामा बिन लादेनचा उत्तराधिकारी अयमान अल-जवाहिरीचे आहे. जवाहिरी अजूनही अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेजवळ वास्तव्यास आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. तसेच जवाहिरीच्या साथीदारांची नावेही या यादीत आहेत. पाकिस्तानमध्ये अटक करून अमेरिकेच्या हवाली केलेल्या डझनहून अधिक दहशतवाद्यांचाही यादीत समावेश आहे. अल रशीद ट्रस्ट, हरकतुल मुजाहिद्दीन, इस्लामिक मुव्हमेंट ऑफ उज्बेकिस्तान, वफा मानवीय संगठन, जैश ए मोहम्मद, रबिता ट्रस्ट, लष्कर ए झांगवी, तहरीक ए तालिबान पाकिस्तान, अशा पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी संघटना संयुक्त राष्ट्रांच्या यादीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button